जब जन्म हुआ, तब मुंह में सोनेका चम्मच था ...!


    जब जन्म हुआ, 
तब मुंह में सोनेका चम्मच था ...!

शके १९०६, गौरी गणपतीच्या आगमना दिनी प.पु. सिद्धयोगी नरसिंह सरस्वती महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन पवित्र झालेल्या पुण्यभूमीत व कृष्णा-पंचगंगेच्या पावन संगमातीरी सनातनी सुसंकृत क्षत्रिय कुळात  ज्येष्ठ सुपुत्र म्हणून अमरसिंह राजे यांचा जन्म झाला. “जब जन्म हुआ, तब मुंह में सोनेका चम्मच था” ही म्हण सार्थ लागू होते राजेंना. अमरसिंह राजेंच्या जन्मानंतर सनातनी हिंदू प्रथेप्रमाणे राजपुरोहित म्हणजेच वाडीवरच्या घराच्या भटजींना सांगून राजेंची कुंडली मांडली. अन अहो आश्चर्य...!! गुरुजींनी बाळ अमरसिंह यांचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतला त्यावेळी, असे त्यांचे चुलत आजोबा स्व. शामराव पाटील उर्फ दादा सांगत. कारण राजेंच्या स्वरुपात कुलोत्पन्न अशी महान व जन्मताच उच्च आध्यात्मिक शक्तिशाली असणारी अवतारी पुरुषोत्तम, कुटुंब सदस्य म्हणून पाटील परिवारात सामील झाली आहे. हे त्यांच्या कुंडलीवरून स्पष्ट होते. घरच्या वारकरी संप्रदायातील भजन-कीर्तन-प्रवचन याबरोबरच आजोबा भारतीय सैन्यात असल्या मुळे कडक शिस्तीच्या भक्तीमय वातावरणात अमरसिंह राजे यांचे संगोपन झाले. पुढे शिक्षणाच्या साठी आपल्या आजोळी व्यवसायाने डॉक्टर असलेल्या आजोबांच्या सान्निध्यात प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले. आजोबा जरी व्यवसायाने डॉक्टर असले तरीही ते बालगंधर्व अभिनय—संगीत व नाट्य संस्थेचे विद्यार्थी व सदस्य होते. त्यामुळे साहजीकच डॉ. आनंदराव पाटील यांनी अभिनय-संगीत व नाट्य, तसेच लेखन व वक्तृत्व कलेचे दान व शिदोरी अमरसिंह राजेंना दिले. त्यास प्रोत्साहन व पाठबळ दिले. याबरोबरच प्राथमिक शिक्षणाच्या प्रगतीत अग्रेसर राहण्याची सवय सुद्धा लावली. ९० च्या दशकात डॉक्टरांचे समाजातील स्थान हे फार पवित्र व जबाबदार पंच म्हणून प्रचलित होते. त्यामुळे परिसरातील घडणाऱ्या भल्या-बुऱ्या घटना व निर्णयाला अमरसिंह राजे यांनी फार जवळून अनुभव केला होता. अनुकूल-प्रतिकुल परिस्थितीत एक मान्यवर व्यक्ती म्हणून कसे वागायचे...!! कसे राहयचे...!! काय-कसे व कधी बोलायचे याचे बाळकडू राजेंना आपल्या बालपणातच आपल्या आजोबाकडून मिळाले होते.पुढे कुमार अवस्थेत हॉटेल व्यावासायिक वडिलांच्या अधिपत्याखाली व्यवसायाचे ज्ञान राजेंना मिळाले.
सर्व काही सुरळीत चालू असताना ऐन तारुण्याच्या पदार्पणातच राजेंचे वडील कै. शिवाजीराव जगदाळे (आबासाहेब) यांना पक्षाघाताचा झटका आला अन ययातीराजचा वाईट काळ सुरु झाला. होय कधी कधी परिस्थिती म्हणी सार्थ करण्यासाठीच जणू असतात. जणू साडेसातीच चालू झाली त्यानंतर. जवळचे च काय घराचे वासे फिरले कि माणसे ही पाठ दाखवतात असे म्हणतात. मग सुरु झाले तप... तपशर्या. या दरम्यानच्या काळात घराला हातभार लागावा म्हणून राजेंनी कोल्हापूर ची वाट धरली पदवी शिक्षणाच्या साठी गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व पार्ट टाईम काम करू लागले. पदवीचे शिक्षण घेत असतानाच सुदैवाने बोरगावकर साहेबांच्या ओळखीने श्री सतीश रणदिवे दिग्दर्शक “ लोकराजा राजर्षी शाहू ” यांची हॉटेल अतिथी मध्ये भेट घेऊन, या मालिकेतील एका छोट्याशा भूमिकेतून आपल्या चंदेरी करीयरची सुरुवात केली. त्यानंतर “भूक” व “ भूमिपुत्र” या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून काम बघितले आणि ठरवले.या चंदेरी दुनियेतील आपला करीयरची सुवर्ण कामगिरी दिग्दर्शक म्हणूनच करायची ! एकीकडे परिस्थितीशी दोन हात करीत आपल्या भावी वाटचालीची दिशा निश्चित करण्यात अमरसिंह राजे मग्न होते. माझी व राजेंची मैत्री ही कॉलेजचीच! याच गोखले कॉलेज च्या प्रांगणात कटिंग चहा पिता पिता आमची मैत्री इतकी घनिष्ट झाली कि आज खऱ्याखुऱ्या मैत्रीची आमच्याकडे बघूनच व्याख्या कळते. प्रत्येक भल्या-बुऱ्या वक्ताला एकमेकांना साथ कशी दयायची असती हे माझ्या मित्राकडून शिकावे. हा लेख लिहिण्याकामी मी अमरसिंह राजेंच्या जवळच्या नातेवाईकांना भेटलो अन मी धन्य झालो...!! ध्यानीमनी नसतानाही एकाला परीस सापडावा अशीच माझी अवस्था झाली.माझा हा मित्र परिस्थितीच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेला मोठा तपस्वी, भावनेच्या हल्लकल्लोळात स्वत:ची स्थित प्रज्ञां ढळू न देणारा प्रज्ञावंत, अत्यंत उच्च कोटीची आध्यात्मिक शालीनता असलेला हा पुरुषोत्तम माझा जिवाभावाचा मित्र आहे यासाठी मी सृष्टी विधात्याचे लाख लाख आभार मानतो !!
हे सर्व सुरु असतानाच समाजातील वाईट चाली-रिती, न्याय- अन्याय वर भाष्य व लिखाण करण्यास राजेंनी सुरुवात केली. कर्म-धर्म संयोगाने आदिवासींच्या, दीन-दलितांच्या, दुर्गम अश्या  वाड्या वस्तीवर येणे-जाणे झाले. या भेटीतून समाजाप्रती असलेली आत्मीयता माझ्या मित्रास शांत बसू देत नव्हती. आपण यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून मग महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचे इंगीत साध्य झाले. ते म्हणजे सहकार !! “ एकमेका सहाय्य करू|| अवघे धरू सुपंथ ||” हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी दिलेला आदर्श शिरसावंद्य मानून याच सहकार शास्त्राचे बळ दंडात मिळवून आपले दारुण्यावस्था दूर करता यावी म्हणून पाक्षिक “सहकार ताकद” च्या माध्यमातून सहकाराचे शिक्षण व त्याचे महत्त्व विषद करू लागले. या सहकार ताकदीचा प्रभाव म्हणा या च्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रच नव्हे तर गोवा, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात व छत्तीसगड चा काही भूभाग पादाक्रांत केला. तिथल्या लोकांचे दुख: दारिद्र्य, सुख- संस्कृती, चाली-रिती समजावून घेतल्या, शासकीय अनास्था, अनागोंदी कारभार बघितला त्यावर योग्य त्या लोकांनाही विनंती आर्जव केले. ह्या त्यांच्या ग्रामीण विकासातील कार्यास पाहता अमरसिंह राजे यांना ‘ महात्मा गांधी ग्राम स्वच्छता अभियान  निर्मल ग्राम पंचायत ’ योजनेच्या केंद्रीय परीक्षण समितीचा सदस्य म्हणून काम करण्याची भूषणावह संधी मिळाली. त्यांनी नक्षलग्रस्त, विद्रोहींच्या ही भागातील काही गावात निडर पणे व निष्पक्षपणे प्रत्यक्ष भेट देऊन केंद्र सरकारला आपला निर्मल ग्राम निरीक्षक अहवाल सादर केला. हे परीक्षण करीत असताना राजेना व त्यांच्या सहकाऱ्यांना भले-बुरे तसेच काही आत्म विवेचन करणारे प्रसंग  अनुभवास आले.
आज एक तपानंतर मी जेंव्हा अमरसिंहजी राजे यांच्या कडे बघतो तेंव्हा मला जाणवते कि, समाजातील उपेक्षीत व्यक्ती, महिला, वंचित घटकांच्या तसेच एड्स ग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी सदैव कार्यरत, समाजातील प्रत्येक जाती-धर्मात अफाट मित्र परिवार असलेला अजातशत्रू, सर्वोत्तम फलज्योतिषी, मानवी वर्तन व स्वभाव यांचा अभ्यासक, प्रत्येक संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारा धैर्यवान, संकटात धावून येणारा व होईल ती आवश्यक मदत करणारा सखा, परखड-स्पष्ट, निडर व सत्य, निष्पक्ष पणे लिखाण करणारा करारी पत्रकार आहे. सर्वांना समान न्याय वागणूक देणारा साधा माणूस या सारखा हाच आहे. आज पर्यन्त फक्त भारतापुरते मर्यादीत असलेले अमरसिंह आता संपूर्ण आशिया खंडात राहणाऱ्या ग्रामीण ग्रामजनाना सहकार्य करीत आहेत. गुरुबंधू प.पु. राष्ट्रसंत भय्यूजी महाराजांनी केलेल्या उपदेशास प्रमाण माणून प्रसारमाध्यम शिक्षण व मुल्य, तळागाळातील गरजू व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी “लेट अमरसिंह ऑल भारत मिडिया लिट्रेसी कॅम्पेन” हा प्रकल्प कार्यान्वीत केला आहे. aBNNI TV हे त्यासाठीच संपूर्ण आशिया खंडातील व्यक्तीचे मुक्त व्यासपीठ आहे. आज जरी हे इवल्याशा रोपट्यात असले तरीही येणारा सुवर्ण काळ नक्कीच ह्यास वटवृक्षाच्या स्वरुपात बघेल.
सरतेशेवटी आपणास विनंती व हक्काची मागणी अमरसिंह राजे यानीं सुरू केलेल्या या प्रकल्पासाठी दिलेला सकारात्मक खारीचा वाटा ही एखादयाचा संसार फुलवू शकतो. प्रयत्न तरी करा...! यश नक्कीच मिळेल ...!!
 जिसका कोई नहीं ||
उसका अमरसिंह है यारो ||
माझ्या बंधुतुल्य मित्राबद्दल लिहिण्याचा योग आला व ती जबाबदारी ताईनी माझ्याकडे सोपविली हे माझे भाग्यच समजतो. अमरसिंह जी राजे या सूर्याच्या बद्दल लिहिताना कागद ही अपुरा पडेल असा आत्तापर्यंत चा जीवनप्रवास व अनुभव मी वेळे अभावी व जागेअभावी माझ्या तोडक्या-मोडक्या, मोजक्याच शब्दांत व्यक्त केला आहे. तो वाचकांनी कृपया समजून घ्यावा व मज पामरास काही चुकले असल्यास माफ करावे, ही विनंती ...!!
मा.इंद्रजीत लुगडे साहेब
हितचिंतक संचालक
aBNNI TV
www.abnnitv.com


Post a Comment

0 Comments