आठवणीतले राजु तात्या...!


स्व. राजाराम विष्णू जगदाळे 
दिनांक १५ जून २०२० रोजी पहाटे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे मृत्यू झाला. 
आमचे चुलते कै. राजाराम विष्णू जगदाळे यांचे आज पहाटे ४ वाजता देहावसान झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, जावई, नात  आणि पत्नी असा परिवार आहे. अल्पशा आजाराने त्यांनी एपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये आपली जीवन यात्रा स्थगित केली.

रक्षा विसर्जन उद्या दिनांक 16 जून मंगळवारी  सकाळी 9 वाजता आहे. 
9 नंबरच्या शेड मध्ये, कोल्हापूर पंचगंगा घाट, कोल्हापूर येथे.

 दिवस कार्य दिनांक २६जुन २०२० रोजी बालाजी पार्क,कोल्हापुर येथे त्यांच्या राह्तत्या घरात आहेत.

आठवणीतले राजु तात्या...!

आज आमचे चुलते  कै. श्री. राजाराम विष्णु जगदाळे याचे निधन झाल्याचे समजले आणि धक्का बसला, दुःख झाले. अनपेक्षितपणे हे घडले. आणि हे दुखद वृत्त समजल्यानंतर त्यांच्याबद्दल काही आठवणी जाग्या झाल्या.राजु तात्या आमच्या वडिलांच्या वर्गवारितले/ वयाचे. नात्याने भाऊ लागत असले तरी त्याचे आणि आमच्या वडिलांचे संबंध मित्रासारखे होते. दोघे एकत्र शाळा शिकले. भरतीला एकत्र गेले, पप्पा भरती झाले, आणि तात्यांना काही कारणास्तव भरती होता आले नाही. त्यानंतर तात्या काही काळ कोल्हापूर मधे होते. आधीच्या वेळी खेडेगावातून आजसारखी बसची व्यवस्था नसायची, त्यावेळी तात्या, पप्पांना आपल्यापाशी ये व मुक्काम कर आणि जा म्हणून बोलवायचे. तात्या एकवेळ अहमदनगर वरून जाताना पप्पांना भेटायला युनिट मधे गेले होते. तात्या मनाने साफ माणूस. कधी कोणाचे वाईट चिंतीले नाही, भावकी मधे कधी कोणाला त्रास दिला नाही. वसु तात्या, बाळु तात्या आणि राजु तात्या यांनी सोन्या शिवाय मला कधी हाक मारली नाही. ते कधी पण भेटले की याच नावाने बोलवायचे. त्यांच्या साठी आम्ही भावकीतली मुले नेहमी लहानच असल्याप्रमाणे वाटायचो, आणि ते आम्हाला तसेच बोलवायचे. माणूस जन्माला येतो आणि सोडून जातो, पण त्यांच्या आठवणी मागे ठेवून जातो. तात्या  नेहमीच आमच्या सर्वांच्या आठवणीत राहतील. 

राजु तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!


तुमचाच पुतण्या 
कु राकेश जगदाळे 
💐💐




Post a Comment

0 Comments