छत्रपती शाहू महाराजांच्या प्रगतशील विचारांनी व कर्तुत्वानी प्रेरित होऊन समाज जागृतीचे कार्य करणारे...शाहू महराजांनी कोल्हापूर संस्थानाचे शिक्षणाधिकारी म्हणून सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पेलत कोल्हापूर गव्हन्मेन्ट सर्वेन्ट को.ऑप.बँक ,,कोल्हापूर न्यूज़पेपर असोसिएशन ,मराठा महिला वसतिगृह ,कोल्हापूर कंझ्युमर्स स्टोअर्स ,कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहकारी संघ या संस्था स्थापन करून त्यांच्या विकासातून कोल्हापूर ला नवी ओळख मिळवून देणारे..दि.प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संस्थापक...नाशिक आणि कोल्हापूर येथे शैक्षणिक ,सामाजिक आणि आर्थिक व सहकार क्षेत्रात आजीवन गौरवशाली कार्य करणारे वंदनिय कैलासवासी राव डी.आर.भोसले यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारे "कर्मवीर रावसाहेब डी.आर. भोसले चरित्र व कार्य "या पुस्तकाचे लेखक प्राचार्य डॉ.विलास पोवार ,कर्मवीर राव डी आर भोसले विद्या मंदिर बस्तवडे शाळा व्यवस्थापण समिती चे अध्यक्ष व पुढारी दैनिक चे जेष्ठ पत्रकार मा.मधुकर भोसले ,शिक्षक नेते मा.बाळासाहेब नींबाळकर , जि.प.शिक्षण समिती सदस्य मा.सुनील पाटील ,आमचे मार्गदर्शक मा.नामदेव चौगले सर यांनी आज शिक्षक बँक येथे येऊन सर्व संचालक मंडळ यांच्या सोबत पुस्तक प्रकाशन सोहळ्याबद्दल विचारविनिमय केला..आदरणीय डॉ. पोवार साहेब यांनी कै. भोसले साहेबांच्या चरित्र लेखनासाठी घेतलेल्या कष्टांना विनम्र वंदन !
सौ.लक्ष्मी पाटील
0 Comments