अमरसिंह जगदाळे सरकार यांचे टपाल तिकीट जारी...!


राजेंच्या कार्याची दखल... जारी झाले पोस्टल तिकीट !



कोल्हापूर : येथील पत्रकार अमरसिंह जगदाळे सरकार उर्फ राजेंच्या चित्राचे भारत सरकार कडून पोस्टल तिकीट जारी केले. फक्त घडलेल्या बातम्या देणे, लेख लिहिणे म्हणजे पत्रकारिता नाही. वार्ताहर ते पत्रकार होण्याचा प्रवास किमान एक तपाचा आहे. देश विकासात आपल्या ताकदीबर भर घालणे न्यायासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे.हीच खऱ्या पत्रकारितेची लक्षणे आहेत. आणि नेमक हेच राजेंनी केलं आहे.
विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥
      निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।
      वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥
राजेंनी नेहमीच शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षण घेण्यासाठी उद्युक्त केले आहे. त्यांना शिक्षणासाठी आवश्यक ती मदत व सहकार्य करत आले आहेत. शिक्षणा बद्दलची अनास्था, घरची परिस्थिती, लहान वयात आलेल्या कौटुंबिक जबाबदारया यामुळे समाजातील बरीच होतकरू मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून अलिप्त आहेत. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, त्याला अनेक संध्या प्राप्त होतात. गरिबी दूर करण्याचे शिक्षण हे मुख्य अस्त्र आहे. तेच राजेंनी गोवा, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील किमान दीडशेहून अधिक मुला-मुलींना दिले आणि त्यांचे किमान पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करावे यासाठी त्यांच्या पालकांचे मनधरणी केली. मुक्त विद्यापीठ, दूरस्थ शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून त्यांनी शिक्षित व्हावे यासाठी राजे नेहमीच प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या छोट्याश्या कार्याची दखल युनोच्या भारतीय प्रतिनिधी असलेल्या डॉ सुधीर तारेनी घेऊन ती युनोला सादर केली आणि त्यांच्या शिफारशी वरून राजेंच्या कार्याबद्दल भारत सरकारने माय स्टम्प श्रेणीतून अमरसिंह जगदाळे उर्फ राजे  यांचे टपाल तिकीट जारी केले.  


राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण खात्याचे अधिकारी कर्मवीर रावबहाद्दूर डी. आर. भोसले यांच्याकडून प्रेरणा घेऊन शाळाबाह्य मुला-मुलींना किमान पदवी पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना उद्युक्त केले.

Post a Comment

0 Comments