अमेरिकन सासुरवाशीनीने दिल्या माहेराला ४० तुकाराम गाथा भेट

अमेरिकन सासुरवाशींनी असलेल्या बस्तवडेच्या माहेरवाशीनीकडून 40 गाथा व 40 व्यासपीठे भेट...


अवघ्या 41 वर्षांच्या आयुष्यात गाथा नावाचा पाचवा वेद श्रीमंत जहद्गुरू तुकाराम महाराज यांनी निर्माण केला. जीवनाच्या सर्वांगाला व्यापुन राहणारी भक्ती बरोबर समाधानी जगण्याचा राजमार्ग दाखवणाऱ्या कालातीत अश्या या 4092 अभंग असलेल्या गाथेचे पारायण बस्तवडे येथील विठ्ठल मंदिरात गेल्या वर्षी अधिक महिन्यात झाले होते.यासाठी गाथा या हमीदवाडा येथील वारकरी संप्रदायाकडून आणल्या होत्या.


त्यावेळी या वाचनाचे काही व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर शेअर झाले होते.सातासमुद्रापार अमेरिकेत न्यूजर्सी येथे असलेल्या सौ.रुपाली विलास मगदूम या आपल्या बस्तवडे गावच्या माहेर वासींनीने पाहिले. रुपालीला हा उपक्रम खूप आवडला.त्यामुळे तिने आपले वडील श्री.रामचंद्र कृष्णाजी पाटील (भाऊ) यांच्याकडे फोन करून मंदिरासाठी जितक्या गाथा व त्यासाठी जी लाकडी व्यासपीठ लागतील ती देण्याची इच्छा व्यक्त केली. भाऊंनी मंदिरात ही बाब सर्वाना सांगितली.


खरे तर शालेय जीवनात असताना स्वतः रुपालीने देखील ज्ञानेश्वरीची काही पारायणे केली होती.त्यावेळी इतक्या दूर राहून देखील आपले गाव, आपली माती आपली माणस,इथल्या परंपरा याबाबत रुपालीला असलेल्या ओढीबाबत सर्वांनी आनंद व्यक्त केला व संभाव्य पारायण संख्या विचारात घेऊन 40 गाथा व त्यासाठी 40 लाकडी व्यसपीठे देखील आणण्याचे निश्चित करण्यात आले.यंदा श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी कराडवरून या गाथा व पंढरपूर वरून व्यासपीठे आणण्यात आली.व गेल्या तीन आठवड्यापासून हे श्रावणी मासिक गाथा पारायण सुरू देखील झाले.
गाथा पारायण बरोबरच नाम सप्ताहातील व्यासपीठांचा प्रश्न या उपक्रमामुळे मार्गी लागला आहे.
या मोलाच्या भेटीबाबत रुपाली व तिचे पती विलासराव मगदुम (दाजी) यांना देखील खूप धन्यवाद...!

राम कृष्ण हरी
--मधुकर भोसले--

Post a Comment

0 Comments