वशिल्याच्या चिठ्ठ्यांवरून बस्तवड्यात रंगला लशींचा कलगीतुरा

 कागल : तालुक्यातील बस्तवडे गावात रविवारी कोव्हिडं लसीकरण घेण्यात आले होते. या लसीकरणाची बातमी गावातील कुणालाच नसताना बाहेरच्या गावांत वास्तव्यास असणाऱ्यांनी ह्या लसीकरणाला हजेरी लावून लस घेतली त्यामुळे गावांतील नागरिकांच्यात कमालीचा असंतोष व नाराजी आहे. 


pravin patil gp member bastavade
ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील लस घेताना.ह्याच लसीमुळे गदारोळात भर पडली. सदस्यांची जबाबदारी या इथे कमी पडली.

प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला अँटीजन टेस्टचे टार्गेट दिले आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी गावपातळीवर सर्व पदाधिकारी कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी प्रत्येक दुकानदाराला सक्तीने टेस्ट करायला पदाधिकाऱ्यांनी लावले. ज्यांनी करण्यास नकार दिला त्यांना दंडात्मक कारवाईची भीती दाखवली. ग्रामपंचायतीच्या साऊंड सिस्टमवरून वेळोवेळी पुकारा करून टेस्टचे टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला. तसाच लसीकरणासाठी पुढाकार न घेता फक्त मर्जीतील मित्र-पै-पाहुण्यांना आगाऊ चिठ्या वाटून लसीकरणाची खैरात वाटण्यात आल्यामुळें ग्रामस्थांनी सोशल मीडियावर याबाबतीत रान उठवले. 

शासनाच्या निर्दशनानुसार ४० वयापेक्षा जास्त असलेल्या वयोवृद्ध ग्रामस्थांना याचा लाभ देणे गरजेचे असताना ऐन गद्धे पंचवीशीतील तरुणांनी याचा लाभ घेतल्यामुळे यात आणखीणच भर पडली. 

सुरवातीला व्हाट्सएपच्या ग्रुपवर चाललेल्या चर्चेला प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी हलक्यात घेतले. या चर्चेला वाटण्याचा अक्षता लावल्या. पण वातावरण तापत असून झाल्या प्रकाराबाबत ग्रामस्थांच्या भावना तीव्र असल्याचे दिसून येताच दुसऱ्या दिवशी पदाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करून सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला. 

पण नाराज ग्रामस्थांनी हे प्रकरण लावून धरले असून कारवाईची टांगती तलवार पदाधिकाऱ्यांच्या मानेवर लटकत आहे. 

ह्या लसीकरणाच्या वेळी ग्रामसेवक संभाजी पाटील हे गैरहजर होते. पण याबाबतीत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन स्वीच ऑफ लागला. चिखलीच्या गावासाठी नियुक्त असलेल्या परिचारिका दिपाली कांबळे ह्या गेल्या १० दिवस रजेवर असल्याने याबाबतीत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करता येत नाही. गावकामागर पोलीसपाटील ह्यांनी "मी बाहेरगावी असल्याने याबाबतीत माहिती घेऊन व्यक्त होईन" असे व्हाटसएपवर पोस्ट करून सांगितले. 

जाणकार ग्रामस्थांनी याबाबतीत तक्रारी दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामस्थांचा जनक्षोभ अतिव आहे.त्यांच्याच ह्या बोलक्या प्रतिकिर्या


'आज गावामध्ये कोरानावरील लसीकरण झालं गावामधील किती लोकांना माहीत आहे की आज लसीकरण झालं???? ज्या वेळी कोरोना टेस्ट करत होते त्यानंतर आत्ताच 8 दिवस अगोदर प्रत्येक दुकानदार ,दुधसंस्था कर्मचारी,बाहेर गावी कामावर आहेत यांची टेस्ट केली प्रत्येक ग्रुप वर मेसेज ,  मधून पुकारल सुधा होत  पण आज परत एकदा (1st डोस) व (2nd डोस) लसीकरण  झालं ही कोणाला पूर्वकल्पना किंवा साधा मॅसेज सुद्धा  कोणत्याही  ग्रुप वर आला नाही ????'- अविनाश पाटील यांची ह्या प्रकरणाला वाचा फोडणारी पहिली प्रतिकीऱया 


'लसीकरणासाठी चिठ्ठ्या वाटण्याचा प्रकार हा अतिशय गंभीर आहे. अश्या प्रकारच्या वशिलेबाजीला खतपाणी घालने अनेक गरजू गोरगरिबांसाठी अन्यायकारक ठरेल. मी झाल्या प्रकाराबाबत जिल्हा आरोग्य विभाग यांचेकडे फोन करून चर्चा केली. सदर प्रकार अतिशय गंभीर असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार देण्याबद्दल त्यांनी सुचवले आहे. याबाबत वरिष्ठ जाणकार लोकांशी चर्चा करून एक ते दोन दिवसात रीतसर लेखी तक्रार जिल्हा आरोग्य विभागाकडे करण्यात येईल'- संघस्वयंसेवक पंकज पाटील

'सरपंच साहेब तुम्ही फक्त चिठ्ठी ची संकल्पना शासन निर्णय आहे की कोणाची अरेरावी आहे सांगा?
चिठ्ठी आधी वाटलेत मग डोस !
तुमची दिलगिरी आम्ही समजतो 
फक्त चिठ्ठीचे नाव गावा समोर आले पाहिजे कोणत्या वर्गीकरण करून चिठ्ठी दिली ...?
वर्गीकरण योग्य असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो'-उद्योजक भूषण पाटील 

"आरोग्य विभाग आणि आमच्यातील ताळमेळ न साधता आल्यामुळे कालचा सर्व प्रकार घडला. निश्चितच आमच्या हातुन चुका झाल्या आहेत, त्या मी गावचा प्रथम नागरिकांच्या वतीने  मान्य करतो पण ह्या चुका नकळत झाल्या आहेत. मला मान्य आहे चुक ही चुक असते ती कोणत्याही पद्धतीने होऊ दे आणि मी प्रामाणिक पणे कोणालाही व्यक्तिगत दोष न देता ही चुक मनापासुन मान्य करतो. असं म्हणतात चुक ही सुधरण्यासाठीच होते, त्यामुळे आता ही चुक येत्या आठवड्यात पुन्हा एकदा लसीकरणाचा कॅम्प करून गावातील जास्तीत जास्त माझ्या माता भगिनीं, माय-बाप, जेष्ठ आणि तरुण सहकारी यांच लसीकरण ऊत्तम आणि नेमक्या प्रकारच नियोजन करुन लसीकरण  करण्याच प्रामाणिक प्रयत्न करण्याचा शब्द देतो. तेव्हा ह्या घडल्या प्रकाराबद्दल मी माझ्या गावातील सर्व दुखवलेले तरुण सहकारी आणि जेष्ठ मायबाप मंडळी यांची दिलगिरी व्यक्त करतो .....!"
आपला नम्र
श्री.पांडुरंग महादेव वांगळे@सरपंच प्रतिनिधी


'Pandurang yadav varlely asun tynchya ghari dusre divshi lagech swab dya mhanun gele pravin yadav yanche vadil varlele asun swab denesati force kela ghari jaun mag tyna las ka nahi sangitl ghari jaun'- विशाल पाटील (बिद्री कारखाना कर्मचारी)

'ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांना लेखी तक्रार करून लिस्ट मागा आणि देण्यास टाळाटाळ केल्यास आपले पत्रकार बंधु आहेतच ते नक्कीच याची दखल घेतील, पण अशा प्रकारांना खीळ ही बसलीच पाहिजे'- अमर पाटील(खाजगी कंपनीचे कर्मचारी)

'यादी साठी आम्ही चिखलीला जावून आलो, अनुरला जावून आलो, तर तेथे यादी देण्यास टाळटाळ  करण्यात येत आहे त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव टाकला जात आहे याला जबाबदार कोण ....direct mhnatayt det nhi'- संतोष पाटील

'दादा माफ करा. पण एवढी गोष्ट लिहण्यासाठी व जनतेच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी तुम्हाला सोळा सतरा तास लागतात व ज्यावेळी किशोर ने मेसेज केला होता त्याचवेळी सगळ सागून मेसेज केला असता तर एवढे काल रात्री पासून मेसेज येत आहेत व वातावरण बिघडत आहे ते बिघडले नसते.असो जे घडले त्याला परत घडवता येत नाही, त्यामुळे तूम्ही काळजी घ्या. आज एका गटाचे नसून तर आपल्या बस्तवडे गावचे प्रथम नागरिक आहात व गावच्या विकासासाठी कार्य करा- राजेश पाटील (मुंबई पोलीस)

गावातील कोणत्याही पदाधिकारयाने कुणालाही गृहित धरू नये हेच सिद्ध होते. परस्पर सामंजस्य आणि जबाबदारीचे भान ठेवुन कार्य करण्यासाठीच खुर्ची आहे. अल्लड आणि पोरकटपणा सोडुन कार्यरत गरजेचे आहे. तरच राजकारणात प्रगती होते.अन्यथा ग्रा.प.च्या पुढे नेतेगिरीचे पाऊल पडणार नाही. हे ही असावे ध्यानी.

Post a Comment

0 Comments