कागल : तालुक्यातील बस्तवडे गावात रविवारी कोव्हिडं लसीकरण घेण्यात आले होते. या लसीकरणाची बातमी गावातील कुणालाच नसताना बाहेरच्या गावांत वास्तव्यास असणाऱ्यांनी ह्या लसीकरणाला हजेरी लावून लस घेतली त्यामुळे गावांतील नागरिकांच्यात कमालीचा असंतोष व नाराजी आहे. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील लस घेताना.ह्याच लसीमुळे गदारोळात भर पडली. सदस्यांची जबाबदारी या इथे कमी पडली. प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला अँटीजन टेस्टचे टार्गेट दिले आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी गावपातळीवर सर्व पदाधिकारी कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी प्रत्येक दुकानदाराला सक्ती…
जीव धोक्यात घालून कोरोना काळात सेवा करणाऱ्या हातांना ध्वजारोहन व ध्वजपूजनाचा मान..! ज्या वेळी आपण सारे कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी संपर्क टाळून घरी होतो त्याचवेळी अगदी 38 तापमान असताना देखील या दोघी मात्र दारोदारी जाऊन सर्व्हे व अन्य काम नेकीने करीत होत्या.त्यांच्याच या समर्पित सेवेला वंदन करण्यासाठी म्हणून कर्मवीर डी. आर.भोसले विद्या मंदिर बस्तवडे चे ध्वजारोहण व ध्वजपूजनाचा मान आपल्या गावातील सौ.सुनीता उत्तम कांबळे व सौ.आशा संजय वांगळे या आशा स्वयंसेविकाना देण्याचा निर्णय शालेय व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
Social Plugin