आपल्या गावातील श्रीमती विमल शिवाजी पाटील यांचे आज सकाळी 10 वाजता दुःखद निधन झाले आहे.... त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो...! भावपूर्ण श्रद्धांजली !
बस्तवडे : येथे आज नवंनिर्वाचित प्रशासक श्री आर. व्ही. कांबळे यांचे स्वागत सदासाखर सह कारखानाचे संचालक श्री बापूसाहेब भोसले, सिद्धीनेर्लीचे श्री शहाजी पाटील यांनी आज केले. या प्रसंगी पत्रकार अमरसिंह राजे, मावळते सरपंच अप्पासो माळी, किरण पाटील, सातप्पा कांबळे, एन. व्ही. कांबळे, संतोष पाटील, विष्णू वांगळे, कोतवाल शरद नरके, पोलीस पाटील धनाजी वायदंडे, प्रमोद पाटील, सुरेश माळी इत्यादी उपस्थितीत होते.
गावचे सुपुत्र श्री प्रकाश बळीराम पाटील कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग महाराष्ट्र शासन हे आज दिनांक ३१/७/२०२० रोजी सेवानिवृत्त झाले. बस्तवडे ग्रामस्थांच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य लाभो !
दिनांक ५ एप्रिल २०२० आज रोजी गावातील ज्येष्ठ वारकरी श्रीमती शांताबाई गोविंद जगदाळे यांचे आज राहत्या घरी देहावसान झाले. त्यांचे मागे मुले, सुना, लेक, नातवंड आहेत.
कधी कधी प्रवास मुळाकडे पण जाणारा असतो..! 1965 मध्ये आदर्श समाज शिक्षक हभप बळवंत भैरू लवाटे गुरुजी यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली बस्तवडे ता कागल येथे श्री विठ्ठल मंदिराची स्थापना झाली व त्याच वर्षी पहिला हरिनाम सप्ताह संपन्न झाला..तिथून 2019 पर्यंत सलग 55 वर्षे हा नामसप्ताह अखंड पणे होत आला मात्र यंदा कोरोना या जागतिक विषाणू मुळे हा सप्ताह दीप वगळता रद्द करावा लागला. 1965 पासून गावात बऱ्यापैकी विठ्ठल मंदिरात भजन कीर्तन सुरू झाले मात्र तत्पूर्वी गावात भजन परंपरेची सक्षमपणे सुरुवात झाली ती चिखलकर मास्तरांच्या घरी..! त्या दरम्यान च…
गावाची पहिली परिवहन निरीक्षक संताजी पाटील यांची कन्या
Social Plugin