पुण्यातील 56 रुग्णालयांकडून अंमलबजावणी होणार, पुणे शहरातील रुबी, जहांगीर, पुना हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल ही सर्व हॉस्पिटल्स धर्मादाय आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मुळी कल्पनाच रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीत पणा कडे बघत घाबरत होते, मुळात ही सर्व मोठमोठी धर्मादाय रुग्णालये असुन सुद्धा या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण घाबरुन मागे फिरतात. याच गोष्टीची जाणीव ठेऊन आमदार लक्ष्मण जगताप यांनी वेळोवेळी विधान सभेमध्ये प्रश्न उपस्थित करुन, …
अमेरिकन सासुरवाशींनी असलेल्या बस्तवडेच्या माहेरवाशीनीकडून 40 गाथा व 40 व्यासपीठे भेट... अवघ्या 41 वर्षांच्या आयुष्यात गाथा नावाचा पाचवा वेद श्रीमंत जहद्गुरू तुकाराम महाराज यांनी निर्माण केला. जीवनाच्या सर्वांगाला व्यापुन राहणारी भक्ती बरोबर समाधानी जगण्याचा राजमार्ग दाखवणाऱ्या कालातीत अश्या या 4092 अभंग असलेल्या गाथेचे पारायण बस्तवडे येथील विठ्ठल मंदिरात गेल्या वर्षी अधिक महिन्यात झाले होते.यासाठी गाथा या हमीदवाडा येथील वारकरी संप्रदायाकडून आणल्या होत्या. त्यावेळी या वाचनाचे काही व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर शेअर झाले होते.सातासमुद्…
कागल : तालुक्यातील बस्तवडे गावात रविवारी कोव्हिडं लसीकरण घेण्यात आले होते. या लसीकरणाची बातमी गावातील कुणालाच नसताना बाहेरच्या गावांत वास्तव्यास असणाऱ्यांनी ह्या लसीकरणाला हजेरी लावून लस घेतली त्यामुळे गावांतील नागरिकांच्यात कमालीचा असंतोष व नाराजी आहे. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील लस घेताना.ह्याच लसीमुळे गदारोळात भर पडली. सदस्यांची जबाबदारी या इथे कमी पडली. प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला अँटीजन टेस्टचे टार्गेट दिले आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी गावपातळीवर सर्व पदाधिकारी कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी प्रत्येक दुकानदाराला सक्ती…
बस्तवडे गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा..! ************************ युपीएससी च्या माध्यमातून कु.हर्षवर्धन शैलेश भोसले याची एनडीए साठी निवड..! *********************** तब्बल नऊ लाख उमेदवारांमधून 350 जणांची निवड त्यात हर्षवर्धन चा समावेश.! ************************ ज्येष्ठ अवकाश संशोधक कै.राजाराम विष्णू तथा आर.व्ही.भोसले सर यांचे भाऊ म्हणजे कै. सखाराम विष्णू भोसले ,सखाराम विष्णू भोसले यांचे सुपुत्र कै.मोहन सखाराम भोसले व मोहन भोसले यांचे चिरंजीव श्री.शैलेश मोहन भोसले व हर्षवर्धन हा श्री.शैलेश काकांचा चिरंजीव. शालेय जीवनापासू…
याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा...." आजची ही पोस्ट लिहिण्याचे कारण असे की,"चांगल्या व्यक्तीमधील चांगुलपणाचा प्रसार व्हावा आणि समाजातील अधिकाधिक लोक चांगुलपणाने वागावेत , यासाठी आपल्याला जे जे चांगले वाटते ते निःसंकोचपणे मांडावे!" असे आमचे मार्गदर्शक व पत्रकार आदरणीय मधुकरदादा नेहमी सांगतात . माझी मुलगी वैष्णवी हिची जिवलग मैत्रीण अस्मिताच्या आजोबांचे 26 जानेवारी रोजी निधन झाले. वैष्णवी आमच्या घरी कमी पण अस्मिताच्या घरी अधिक असते असे म्हटले तर वावगे होणार नाही. अस्मिताने आपल्या आजोबांना कधी चाललेले पाह…
आपल्या गावातील श्रीमती विमल शिवाजी पाटील यांचे आज सकाळी 10 वाजता दुःखद निधन झाले आहे.... त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो...! भावपूर्ण श्रद्धांजली !
आपल्या गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक व माजी सैनिक श्री.आनंदा ज्ञानू जगदाळे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
जीव धोक्यात घालून कोरोना काळात सेवा करणाऱ्या हातांना ध्वजारोहन व ध्वजपूजनाचा मान..! ज्या वेळी आपण सारे कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी संपर्क टाळून घरी होतो त्याचवेळी अगदी 38 तापमान असताना देखील या दोघी मात्र दारोदारी जाऊन सर्व्हे व अन्य काम नेकीने करीत होत्या.त्यांच्याच या समर्पित सेवेला वंदन करण्यासाठी म्हणून कर्मवीर डी. आर.भोसले विद्या मंदिर बस्तवडे चे ध्वजारोहण व ध्वजपूजनाचा मान आपल्या गावातील सौ.सुनीता उत्तम कांबळे व सौ.आशा संजय वांगळे या आशा स्वयंसेविकाना देण्याचा निर्णय शालेय व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
Social Plugin