बस्तवडे गावातील भजनी परंपरेचे अध्वर्यू व एक अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले धोंडीराम वाळेकर मामा हे 5 सप्टेंबर 2015 रोजी गोकुळ अष्टमी दिवशी अगदी अचानकपणे गेले.अगदी तसेच आदरणीय अनुसया वाळेकर मामी देखील आज मार्गशीर्ष द्वादशीला अचानक गेल्या. आदरणीय मामा यांच्या भजन सेवेतील 61 वर्षे पूर्ण झालेबद्दल नोव्हेंबर 2013 मध्ये त्यांचा व मामींचा सत्कार विठ्ठल मंदिराच्या वतीने दलीतमित्र एस.आर.बाईत सर,प्रसिद्ध प्रवचनकार अशोक कौलवकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला होता. या आदर्श दाम्पत्याच्या पवित्र स्मृतींना वंदन.! शब्दांकन मधुकर भोसले
स्व. राजाराम विष्णू जगदाळे दिनांक १५ जून २०२० रोजी पहाटे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे मृत्यू झाला. आमचे चुलते कै. राजाराम विष्णू जगदाळे यांचे आज पहाटे ४ वाजता देहावसान झाले. त्यांच्या मागे मुलगा , मुलगी , जावई , नात आणि पत्नी असा परिवार आहे. अल्पशा आजाराने त्यांनी एपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये आपली जीवन यात्रा स्थगित केली. रक्षा विसर्जन उद्या दिनांक 16 जून मंगळवारी सकाळी 9 वाजता आहे. 9 नंबरच्या शेड मध्ये , कोल्हापूर पंचगंगा घाट , कोल्हापूर येथे. दिवस कार्य दिनांक २६जुन २०२० रोजी बालाजी पार्क,कोल्…
बस्तवडे : येथे आज नवंनिर्वाचित प्रशासक श्री आर. व्ही. कांबळे यांचे स्वागत सदासाखर सह कारखानाचे संचालक श्री बापूसाहेब भोसले, सिद्धीनेर्लीचे श्री शहाजी पाटील यांनी आज केले. या प्रसंगी पत्रकार अमरसिंह राजे, मावळते सरपंच अप्पासो माळी, किरण पाटील, सातप्पा कांबळे, एन. व्ही. कांबळे, संतोष पाटील, विष्णू वांगळे, कोतवाल शरद नरके, पोलीस पाटील धनाजी वायदंडे, प्रमोद पाटील, सुरेश माळी इत्यादी उपस्थितीत होते.
गावचे सुपुत्र श्री प्रकाश बळीराम पाटील कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग महाराष्ट्र शासन हे आज दिनांक ३१/७/२०२० रोजी सेवानिवृत्त झाले. बस्तवडे ग्रामस्थांच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य लाभो !
हार्दिक अभिनंदन ! आमचे ओंकार युवराज जगदाळे हा SSC बोर्डाच्या परीक्षेत 82.40%मार्क्स मिळवुन उत्तीर्ण झाला त्याबद्दल त्याचे व मुरगुड विद्यालय मुरगुडच्या सर्व शिक्षक स्टाफ व मुख्याध्यापक यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ! त्याला श्री. विजय पाटील सर, J. D. पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले !
स्व.सौ. सुनंदा रामचंद्र जगदाळे यांचे हृदय आघाताने रात्रौ 12 च्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, नातवंडं आहेत. रक्षा विसर्जन उद्या सकाळी 9 वाजता आहे.
अत्यन्त दुःखद घटना आपल्या गावातील कै.सुभाष मारूती माळी यांची कन्या व आनंदा माळी यांची पुतणी कु. नम्रता सुभाष माळी (वय 23) हिचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रात्री दु:खद निधन झाले. या अत्यन्त धक्कादायक घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे. ईश्वर तीच्या आत्म्यास चिरशांती देवो, ही प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत तसेच या खूप कठीण काळातून सावरण्याची शक्ती देवाने या परिवारास द्यावी हीच ईश्वरचरणी विनंती !
दिनांक ५ एप्रिल २०२० आज रोजी गावातील ज्येष्ठ वारकरी श्रीमती शांताबाई गोविंद जगदाळे यांचे आज राहत्या घरी देहावसान झाले. त्यांचे मागे मुले, सुना, लेक, नातवंड आहेत.
कधी कधी प्रवास मुळाकडे पण जाणारा असतो..! 1965 मध्ये आदर्श समाज शिक्षक हभप बळवंत भैरू लवाटे गुरुजी यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली बस्तवडे ता कागल येथे श्री विठ्ठल मंदिराची स्थापना झाली व त्याच वर्षी पहिला हरिनाम सप्ताह संपन्न झाला..तिथून 2019 पर्यंत सलग 55 वर्षे हा नामसप्ताह अखंड पणे होत आला मात्र यंदा कोरोना या जागतिक विषाणू मुळे हा सप्ताह दीप वगळता रद्द करावा लागला. 1965 पासून गावात बऱ्यापैकी विठ्ठल मंदिरात भजन कीर्तन सुरू झाले मात्र तत्पूर्वी गावात भजन परंपरेची सक्षमपणे सुरुवात झाली ती चिखलकर मास्तरांच्या घरी..! त्या दरम्यान च…
गावाची पहिली परिवहन निरीक्षक संताजी पाटील यांची कन्या
गावात लखन कांबळे यांच्या घरी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
हा शिलालेख मसूर परगणा सध्याचे मसूर ता कराड, जिल्हा सातारा येथे मा.मानसिंगराव जगदाळे यांच्या कडील प्राचीन वाड्यातील अवशेष मध्ये निर्दशनास आला आहे.
आपल्या गावातील मुरगुड वि.मुरगुडचा विद्यार्थी कु.सुधर्म ओंकार माळी हा NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाला.त्याला 9 वि ते 12 वि पर्यंत केंद्रशासनाकडून रु.48000 इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे.त्याचे व त्यांच्या पालकांचे हार्दीक अभिनंदन ! ग्रामस्थांच्यात त्याच्या बद्दल कौतुक आहे.
काल रात्री बस्तवडे स्मशानभूमी जवळ गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले. हा जंगली प्राणी आपले नैसर्गिक आवास सोडून मनुष्यवस्तीत फिरू लागलेने येथील ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. वारेमाप जंगल तोड त्यामुळे खाद्याच्या, पाण्याच्या शोधात ही जंगली प्राणी आपला नैसर्गिक अधिवास सोडून फिरत आहेत. बस्तवडे च्या ग्रामस्थांनी सध्या सावध राहणं गरजेचे आहे. विशेषतः शेतात जाणाऱ्या लोकांनी ! छाया सौजन्य: धनंजय पाटील, बस्तवडे
छत्रपती शाहू महाराजांच्या प्रगतशील विचारांनी व कर्तुत्वानी प्रेरित होऊन समाज जागृतीचे कार्य करणारे...शाहू महराजांनी कोल्हापूर संस्थानाचे शिक्षणाधिकारी म्हणून सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पेलत कोल्हापूर गव्हन्मेन्ट सर्वेन्ट को.ऑप.बँक ,,कोल्हापूर न्यूज़पेपर असोसिएशन ,मराठा महिला वसतिगृह ,कोल्हापूर कंझ्युमर्स स्टोअर्स ,कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहकारी संघ या संस्था स्थापन करून त्यांच्या विकासातून कोल्हापूर ला नवी ओळख मिळवून देणारे..दि.प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संस्थापक...नाशिक आणि कोल्हापूर येथे शैक्षणिक ,सामाजिक आणि आर्थिक व सहक…
मराठ्यांचे प्राचीनत्व ? 96 कुळी म्हणजे काय आहे ? 96 कुळी म्हणजे काय आहे ? ९६ कुळी मराठ्यांनी आप आपले देवक , कुळ आणि गोत्र जाणून घ्या 1. गोत्र – आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र…. यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र,जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती…. 2. देवक – ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते… वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी. 3. वंश – क्षात्र समाजात दोन वंश आहेत. १. सोमवंश २. सुर्यवंश. यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत… या ९६ क…
राजेंच्या कार्याची दखल... जारी झाले पोस्टल तिकीट ! कोल्हापूर : येथील पत्रकार अमरसिंह जगदाळे सरकार उर्फ राजेंच्या चित्राचे भारत सरकार कडून पोस्टल तिकीट जारी केले. फक्त घडलेल्या बातम्या देणे, लेख लिहिणे म्हणजे पत्रकारिता नाही. वार्ताहर ते पत्रकार होण्याचा प्रवास किमान एक तपाचा आहे. देश विकासात आपल्या ताकदीबर भर घालणे न्यायासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे.हीच खऱ्या पत्रकारितेची लक्षणे आहेत. आणि नेमक हेच राजेंनी केलं आहे. विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥ निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।। वित्त वि…
आपल्या कर्मवीर डी.आर. भोसले विद्या मंदिर बस्तवडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला शाळेच्या परसबागेतील मेथीच्या भाजीचा आस्वाद.. शाळेच्या प्रांगणात उपलब्ध जागेनुसार छोटीशी परसबाग केली असून त्यात फुल झाडांसहित थोडीशी भाजी पण करण्यात आली आहे. कोणतेही रासायनिक खत न टाकता सेंद्रिय पद्धतीने वाढलेल्या या भाजीची चव मुलांनी पोषण आहारात चाखली. या बागेसाठी कष्ट घेणाऱ्या शिक्षक स्टाफ व विद्यार्थ्यांचे अभिनंदन...!
सांगा आणि कमवा तुम्ही तुमच्या मित्रांच्या/नातेवाईकांच्या/सहकाऱ्यांच्या किंवा माहितीतील लोकांच्या कोणत्याही गरजा (सफल सेवा लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या ) सफलच्या माध्यमातून पूर्ण करून एक पैशा पासून ते एक लाखां पेक्षाही जास्त कमाई करू शकता. त्यांची क्लायंटची माहिती दिल्या नंतर आमची टीम त्यांच्या (क्लायंट) शी संपर्क करेल. त्यांची नेमकी गरज आणि त्यासाठीची पूर्तता करून ती गरज पूर्ण करेल. व्यवहार यशस्वी झाला कि त्या यशस्वी व्यवहारा पोटी आपले मानधन आपल्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल. (रोख किंवा रोकड असेल तर) किंवा गिफ्ट व्हावच…
जगदाळे सरदार "जगदाळे घराणे" हे मुळचे धार येथील राजे पवार यांच्या घराण्याची शाखा होय.पवार घराण्यापासून जगदाळे,निंबाळकर आणि पोकळे हि घराणी निर्माण झाली.जगदाळे घराणे ९६ कुळी मराठा घराणे आहे. हे घराणे १६५९ पासून मराठा साम्राज्यात म्हणजेच स्वराज्यात समाविष्ट झाले.पानिपत च्या युद्धात गाजवलेल्या भीम पराक्रमासाठी हे घराणे प्रसिद्ध आहे. • १ घराण्याचा विस्तार • २ इतिहास • ३ गणेशोत्सवाची सर्वात जुनी परंपरा • ४ संदर्भ घराण्याचा विस्तार बहामनी काळापासून(इसवी सन १३९५) या घराण्याला सुमारे १६८ गावाची मसूर परगणा येथील देशम…
जब जन्म हुआ, तब मुंह में सोनेका चम्मच था ...! शके १९०६, गौरी गणपतीच्या आगमना दिनी प.पु. सिद्धयोगी नरसिंह सरस्वती महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन पवित्र झालेल्या पुण्यभूमीत व कृष्णा-पंचगंगेच्या पावन संगमातीरी सनातनी सुसंकृत क्षत्रिय कुळात ज्येष्ठ सुपुत्र म्हणून अमरसिंह राजे यांचा जन्म झाला. “जब जन्म हुआ, तब मुंह में सोनेका चम्मच था” ही म्हण सार्थ लागू होते राजेंना. अमरसिंह राजेंच्या जन्मानंतर सनातनी हिंदू प्रथेप्रमाणे राजपुरोहित म्हणजेच वाडीवरच्या घराच्या भटजींना सांगून राजेंची कुंडली मांडली. अन अहो आश्चर्य...!! गुरुजींनी बाळ…
Social Plugin